आमचे विकास कामे आणि कार्यक्रम
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली
लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली.
गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
ग्रामपंचायत कार्यालय कांबी व पंचायत समिती बीड यांच्या विद्यमाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार चे आयोजन करण्यात आले होते
ग्रामपंचायत कांबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावरील सर्व महिला कर्मचारी यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला तसेच आशा कार्यकर्ते ताई यांनी 470 उद्दिष्ट पैकी 437 आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यामध्ये सर्वाधिक काढल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला
पाण्याची घंटा
"पाण्याची घंटा" (water Bell) हा एक सोपा पण प्रभावी उपक्रम आहे. ज्यामध्ये ठराविक वेळेला घंटा वाजवून लोकांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाते. ग्रामपंचायत कांबी ता. जि. बीड अंतर्गत जि.प. शाळा कांबी येथे "पाण्याची घंटा" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये दर दोन तासांनी घंटा वाजवून मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यात येते.
स्त्री जन्माचे स्वागत
"स्त्री जन्माचे स्वागत" हा उपक्रम समाजात मुलगी जन्माला येण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे:-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परसबाग उपक्रम राबविण्यात आला
दिनांक 25/03/2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र कांबी येथे विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी परसबाग उपक्रम राबविण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला सभा व “एक कुटुंब – एक झाड” उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला सभेच्या निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच “एक कुटुंब – एक झाड” हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अपंग निधी वाटप कार्यक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अपंग निधीचे वितरण करण्यात आले.
“ॲनिमिया मुक्त गाव” अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर
ॲनिमिया मुक्त गाव उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महिलांचे हिमोग्लोबिन, बीपी व शुगर तपासणी शिबिर आयोजित
महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांतर्गत स्वच्छता उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने पशुधन आरोग्य संवर्धनासाठी पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत गावांतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
क्रांतिज्योती Savitribai Phule व राजमाता Jijabai यांच्या जयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ५०% सूट योजनेअंतर्गत थकबाकी वसुली उपक्रम
थकबाकी रकमेवर ५०% सूट देत विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा” उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दर आठवड्यात एक दिवस “स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबवून मंदिराजवळील परिसराची साफसफाई करण्यात आली.
लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्राची उभारणी
ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले.
कार्यक्रम श्रेण्या
आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या
शिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा
- • गुणवंत विद्यार्थी सत्कार
- • शैक्षणिक शिबिरे
- • स्पर्धा आणि परीक्षा
आरोग्य कार्यक्रम
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे
- • विनामूल्य आरोग्य शिबिर
- • रक्तदान शिबिर
- • आरोग्य जागृती कार्यक्रम
स्वच्छता कार्यक्रम
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम
- • स्वच्छ भारत अभियान
- • कचरा व्यवस्थापन
- • पर्यावरण जागृती
कार्यक्रमांचा प्रभाव
आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे
सामाजिक एकता
गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले
शैक्षणिक प्रगती
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
आरोग्य सुधारणा
नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती
पर्यावरण जागरूकता
स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली