बीड जवळील निसर्गरम्य व प्रगतिशील गाव

कांबी

कांबी हे बीड जिल्ह्यापासून १० कि.मी. अंतरावर व बीड-जालना NH 12 पासून ३ कि.मी. अंतरावर वसलेले गाव आहे. गावात मारुती मंदिर, श्री हनुमान मंदिर व जालिंदरनाथ मंदिर प्रसिद्ध असून नव्याची पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. सुमारे ९०% लोक शेतीवर अवलंबून असून गाव रस्ते, स्वच्छता, वृक्षारोपण यासह विविध शासकीय योजनांद्वारे विकास करत आहे.

1100+
एकूण लोकसंख्या
637+
मतदार संख्या
नागरिक पोर्टल
प्रस्तावना

प्रगतशील गाव: कांबी ता.बीड

१) भौगोलिक व सामाजिक परिचय
बीड जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे कांबी हे एक प्रगतिशील आणि विकासाभिमुख गाव आहे. भौगोलिकदृष्ट्या हे गाव जिल्हा मुख्यालय बीडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर असून, बीड–जालना राष्ट्रीय महामार्ग (NH 12) वरील पेंडगाव क्षेत्रापासून अवघ्या २ ते ३ कि.मी. पश्चिमेला निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. सुमारे ११०० लोकसंख्या असलेल्या या गावातील ९०% ग्रामस्थ कृषी व्यवसायाशी जोडलेले असून, येथे प्रामुख्याने आंबा आणि नारळ यांसारख्या बागायती पिकांची लागवड केली जाते.
२) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व समर्थ नेतृत्व
गावाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी १७ सप्टेंबर २०२५ पासून आम्ही 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'त सक्रिय सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी:
मा. सरपंच: श्री. लहू आनेराव
मा. उपसरपंच: श्रीमती. रेखा घोरपडे
ग्रामपंचायत अधिकारी: श्रीमती. स्वप्नाली पवार
यांच्यासह सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभत आहे.

३) प्रमुख वैशिष्ट्ये आणि विकास उपक्रम
महिला सक्षमीकरण (राजमाता जिजाऊ बचत गट भवन): गावातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी मा. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'राजमाता जिजाऊ बचत गट भवनाचे' भव्य लोकार्पण करण्यात आले आहे. हे भवन महिला बचत गटांच्या प्रगतीचे हक्काचे केंद्र ठरत आहे.
स्वच्छता व पर्यावरण: प्लास्टिक मुक्तीसाठी कुटुंबनिहाय कापडी पिशव्यांचे वाटप आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन स्वतंत्र डस्टबीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सुरक्षा व तंत्रज्ञान: संपूर्ण गाव, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आणि अंगणवाड्या CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असून, शाश्वत ऊर्जेसाठी सौर यंत्रणा (Solar System) कार्यान्वित आहे.

आरोग्य व पशुसंवर्धन: गाव 'ॲनिमिया मुक्त' करण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि पशुधनासाठी लसीकरण व पशुखाद्य वाटपाचे उपक्रम राबवले जातात.
डिजिटल शिक्षण: जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंगद्वारे आधुनिक डिजिटल शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
धार्मिक व सांस्कृतिक वारसा: कांबी गावाला समृद्ध धार्मिक परंपरा लाभली आहे. गावात सुप्रसिद्ध जालिंदरनाथ मंदिर असून, येथे 'नव्याची पौर्णिमा' निमित्त मोठी यात्रा भरते. तसेच श्री हनुमान मंदिर आणि मारुती मंदिर ही ग्रामस्थांच्या श्रद्धेची केंद्र आहेत. पावसाळ्यात गावाजवळील टेकड्यांचे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
महिला बचत गट, युवक मंडळे आणि सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीतून कांबी गाव आज 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'त एक आदर्श आणि समृद्ध गाव म्हणून नावारूपास येत आहे.

आरोग्य तपासणी शिबीर

आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामसभा

ग्रामसभा

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

कार्यक्रम

कार्यक्रम

आमचे प्रशासकीय अधिकारी

सौ. रेखा नारायण घोरपडे
सौ. रेखा नारायण घोरपडे

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9322533201

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. लहू ब्रम्हदेव आनेराव
श्री. लहू ब्रम्हदेव आनेराव

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9822489291

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्रीमती. पवार स्वप्नाली दिलीपराव
श्रीमती. पवार स्वप्नाली दिलीपराव

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9518999271

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्री. सोमेश्वर जालिंदर रहाडे
श्री. सोमेश्वर जालिंदर रहाडे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

9284514112

श्रीमती. वृषाली गुणाजी शिंदे
श्रीमती. वृषाली गुणाजी शिंदे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

8669174178

श्रीमती. उषा परमेश्वर कटवाटे
श्रीमती. उषा परमेश्वर कटवाटे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

8766998985

श्री. विकास शामराव पिसाळ
श्री. विकास शामराव पिसाळ

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

8208242443

श्रीमती. प्रमिला कैलास कदम
श्रीमती. प्रमिला कैलास कदम

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

9322889150

श्री. गोरक्षनाथ बबन भडके
श्री. गोरक्षनाथ बबन भडके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

7972449299

श्री. भाऊसाहेब आश्रुबा भडके
श्री. भाऊसाहेब आश्रुबा भडके

रोजगार सेवक

संपर्क माहिती

रोजगार सेवक

8329465678

श्री.संतोष लक्ष्‍मण डोंगरे
श्री.संतोष लक्ष्‍मण डोंगरे

संगणक परिचालक

संपर्क माहिती

संगणक परिचालक

9372973999

श्री नारायण अर्जुन जाधव
श्री नारायण अर्जुन जाधव

सफाई कर्मचारी

संपर्क माहिती

सफाई कर्मचारी

7498009331

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

कांबी

तालुका

बीड

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

६७२

एकूण लोकसंख्या

१५७

एकूण कुटुंबे

६३७

मतदार संख्या

५९.४०%

साक्षरता दर

१९६५

स्थापना वर्ष

२५० हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

पाणी स्रोत

२२

स्ट्रीट लाईट

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली
लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली
लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली
सामाजिक

लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली

१६ मार्च २०२६

लोकसहभागातून प्लास्टिक संकलन केंद्र उभारणी करण्यात आली.

गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन
सामाजिक

गटविकास अधिकारी मा. सानप सर यांच्या हस्ते जिजाऊ महिला ग्रामसंघ कार्यालय चे उद्दघाटन

४ फेब्रुवारी २०२६

ग्रामपंचायत कार्यालय कांबी व पंचायत समिती बीड यांच्या विद्यमाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार चे आयोजन करण्यात आले होते

ग्रामपंचायत कांबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
ग्रामपंचायत कांबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
ग्रामपंचायत कांबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
सामाजिक

ग्रामपंचायत कांबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

८ मार्च २०२६

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावरील सर्व महिला कर्मचारी यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला तसेच आशा कार्यकर्ते ताई यांनी 470 उद्दिष्ट पैकी 437 आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यामध्ये सर्वाधिक काढल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार सन्मान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला

ग्रामपंचायत संपर्क

कांबी ग्रामपंचायत

ग्रामस्थांनो, तुमच्या सूचना आणि समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा. विकासकामांमध्ये तुमचा सक्रिय सहभाग आम्हाला प्रेरणा देतो.

पत्ता

कांबी, ता. बीड, जि. बीड, महाराष्ट्र - 431122

दूरध्वनी

+91 9518999271

ईमेल

grampanchayatkambi.2026@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00

आमचे स्थान

कांबी, ता. बीड

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या